४ . वीट
चंद्र तारे आकाशीचे
सांगू नको तोडायाला
आणि नक्षत्रांची फुले
मागू नको माळायाला
सोन्या चांदीचा बंगला
सांगू नको बांधायाला
हि-या मोत्यांचे दागिने
मागू नको घालायाला
हातावरच्या फोडासारखं
सांगू नको जपायाला
काळजाच्या पायघड्या
सांगू नको घालायाला
तुझ्यासाठी देण्यापेक्षा
माझा जीव प्यारा मला
तुझ्या अशा मागण्यांचा
आता मला वीट आला
चंद्र तारे आकाशीचे
सांगू नको तोडायाला
आणि नक्षत्रांची फुले
मागू नको माळायाला
सोन्या चांदीचा बंगला
सांगू नको बांधायाला
हि-या मोत्यांचे दागिने
मागू नको घालायाला
हातावरच्या फोडासारखं
सांगू नको जपायाला
काळजाच्या पायघड्या
सांगू नको घालायाला
तुझ्यासाठी देण्यापेक्षा
माझा जीव प्यारा मला
तुझ्या अशा मागण्यांचा
आता मला वीट आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा