३ . आपलं घर
असावं हक्काचं
आपलं घर
आपल्या घराची
बातच और
आपल्या घरात
आपली ऐट
जरी नसेल
खिशात नोट
आपल्या घरात
आपली मिजास
जगाची पर्वा
करावी कशास
आपल्या घरात
आपला माज
नसेना काही
काम नी काज
आपल्या घरात
आपली मर्जी
फेकून देऊ
अंड्याची भुर्जी
आपल्या घरात
आपले लाड
फोडाचे होईल
कौतुक कोड
आपल्या घरात
आपले पाप
आपल्या पोरांचे
आपण बाप
आपल्या घरात
आपली मस्ती
जेव्हा होईल
थोडीशी जास्ती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा