२ . काहीतरीच
महागाई केवढी वाढली आहे
काहीतरी केले पाहिजे
जगण्यासाठी तरी आता
चोरी मारी केली पाहिजे
साधी चोरी करण्यापेक्षा
थोडे धाडस केले पाहिजे
बँका आणि जव्हे-यांवर
दरोडेच घातले पाहिजेत
दरोडे घालून पळण्यापेक्षा
जरा विचार केला पाहिजे
थोडे फार डोके चालवून
वित्त घोटाळा केला पाहिजे
एखादी वित्त संस्था काढून
पैसा गोळा केला पाहिजे
सर्व गुंतवणूकदारांना गंडवून
देशाबाहेर पळाले पाहिजे
देशाबाहेर पळण्यापेक्षा
प्रकरण इथेच दाबले पाहिजे
थोडेफार पैसे फेकून
पोलिसच विकत घेतले पाहिजेत
पोलिसांना विकत घेण्यापेक्षा
राजकारणात उतरले पाहिजे
लोकसभेची निवडणूक लढवून
खासदारच झाले पाहिजे
नुसते खासदार होण्यापेक्षा
खासदारांचा नेता झाले पाहिजे
सगळ्या पक्षांची मोट बांधून
पंतप्रधानच झाले पाहिजे
पंतप्रधान झाल्यावरती
भ्रष्टाचारच केला पाहिजे
सर्व काही करून सवरून
सन्मानाने मिरवले पाहिजे
देश चुलीत गेला तरी
आपले भले व्हायला पाहिजे
जगणेच महाग झाले आहे
एवढे तरी केलेच पाहिजे
एवढे जमले नाही तर मग
जीवच आपला दिला पाहिजे
आणि शेवटी मरतानाही
बेवारसच मेले पाहिजे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा